जळगाव : प्रतिनिधी
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे सेवानिवृत्त विद्यार्थी प्रमोद ठोसर प्रथम तर एस.टी.संवर्गातून परवर लतिक तडवी (179) तिसऱ्या क्रमांकाने व विजयसिंह पाटील यांची जळगाव तलाठीपदी निवड झाल्याबद्दल त्याचा क्लासतर्फे सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील, नारायण पाटील, उमेश सुर्यवंशी उपस्थित होते. दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या शिक्षकांचे वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन लाभल्याने हे यश प्राप्त करता आले असे उद्गार परवर तडवी याने सत्काराप्रसंगी काढले. मेहनत व कष्टाच्या बळावर रिक्षा चालकाचा मुलगा तलाठी होवू शकता असे गौरोद्गार वासुदेव पाटील यांनी काढले.
दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या सर्व परिवाराकडून यशस्वी विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन करण्यात आले.