Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ – आ.मंगेश चव्हाण
    चाळीसगाव

    मोदिजींचे हात बळकट करण्यासाठी भाजपच्या उमेदवार स्मिताताई वाघ – आ.मंगेश चव्हाण

    editor deskBy editor deskMarch 16, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव भारतीय जनता पक्षाची महत्वाची बैठक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी जेष्ठ नेते वसंतराव चंदात्रे, प्रीतमदास रावलानी, सुरेश तात्या सोनवणे, संजय भास्करराव पाटील, के.बी.साळुंखे, प्रेमचंद खिवसरा, सुरेशभाऊ स्वार, धर्मराज वाघ, राजेंद्र चौधरी, शेषरावबापू पाटील, जगनअप्पा महाजन, महिला मोर्चाच्या देवयानीताई ठाकरे, संगीताताई गवळी, मार्केट सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, संघटना पदाधिकारी प्रशांत पालवे, धनंजय मांडोळे, रमेश सोनवणे, प्रा.सुनील निकम सर, नितीनभाऊ पाटील, घृष्णेश्वर तात्या पाटील, शेतकी संघाचे अविनाशनाना चौधरी, विवेक चौधरी, अमोल चव्हाण, अमोल नानकर, गिरिष बरहाटे, युवा मोर्चाचे भावेश कोठावदे, गोरख राठोड, मनोज गोसावी, तालुक्यातील भाजपचे, सुपर वॉरीयर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बूथप्रमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सांगितले की, २०१४ नंतर भारताच्या विकासाला मिळालेली गती व पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलेलं काम पाहून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भारतात ३०० हून अधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या होत्या. त्यानंतर गेल्या ५ वर्षात पंतप्रधान मोदिजींच्या नेतृत्वाखाली जगात भारताचा डंका वाजत आहे. त्यामुळे भारताला विकसित देश करण्यासाठी मोदिजींचे हात बळकट करणे गरजेचे असून “अबकी बार ४०० पार” चा नारा पक्षाने दिला आहे.

    जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपा महायुतीचा बालेकिल्ला असून पक्षाने वेळोवेळी ज्याला उमेदवारीची संधी दिली त्याला भरघोस मतांनी जनतेने विजयी केलं आहे. या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या श्रीमती स्मिताताई वाघ यांना नेतृत्वाने उमेदवारी दिली असून खऱ्या अर्थाने नारीशक्तीचा सन्मान केला आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात नामदार गिरिषभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त १ लाखांचा लीड हा स्मिताताई वाघ यांना चाळीसगाव मतदारसंघातून राहील असा निर्धार यावेळी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी व्यक्त केला

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    जामनेरमध्ये बोगस मतदानाचा थरार : कार्यकर्त्यांनी तरुणाला केंद्रावरच पकडलं

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.