Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विहिरीत आढळला होता मृतदेह ; महिन्याभराने झाली खुनाची उकल
    क्राईम

    विहिरीत आढळला होता मृतदेह ; महिन्याभराने झाली खुनाची उकल

    editor deskBy editor deskMarch 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बोदवड : प्रतिनिधी

    तालुक्यातील जलचक्र बुद्रूक शिवारातील विहिरीत महिनाभरापूर्वी एक मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. या घटनेमागील गूढ उकलण्यात जवळपास महिन्याने बोदवड पोलिसांना यश आले आहे. ही घटना खुनाची असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एकास अटकही करण्यात आली.

    मिळालेल्या माहितीनुसार, प्रेत कुजल्यामुळे चेहरा नव्हता. हाडांच्या सांगाड्यात असलेल्या कपड्यांवरून तपास करीत पोलिसांनी हा तपास लावला आहे. गत महिन्यात १८ फेब्रुवारीला तालुक्यातील जलचक्र बु, शिवारात शंकर जयराम पाटील यांच्या शेतातील १०० फूट खोल कोरड्या विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तब्बल महिनाभर तपास सुरू ठेवला. मयत कुवरसिंग राजाराम बारेला (३५, रा. खामना, जि. बुऱ्हाणपूर, हल्ली मुक्काम जुनोना, ता. बोदवड) असल्याची ओळख पटवत त्याचा खून केल्याच्या संशयातून आरोपी जगदीश ऊर्फ सत्र्या गण्या पावरा (४३, रा. रायसागर, ता. भगवानपुरा, जि खरगोन, मध्य प्रदेश) यास १३ मार्च रात्री त्याच्या गावातून अटक केली.

    प्रभारी अधिकारी राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी अंकुश जाधव यांनी तपास केला. त्यांना पोलिस दीपक पाटील भगवान पाटील यांचे सहकार्य लाभले. आरोपीचे मोबाईल लोकेशनवरुन त्याच्यावर संशय गेला. या गुन्ह्याशी संबंध असल्याचा यावरुन संशय बळावला. दरम्यान, खून कसा केला व कोणत्या कारणावरुन केला याबाबतची अधिक माहिती पोलिस घेत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.