विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विश्वकर्मा वंशीय समाज संस्थाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील सुतारवाडी येथील ७ वर्षाच्या अबोली या बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत संशयित आरोपी संतोष थोरात याला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच पीडित कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर विश्वकर्मा वंशीय समाज संस्थेचे विभागीय महिला अध्यक्ष पूनम खैरनार, संजय दीक्षित, हेमंत भालेराव, दीपक खैरनार, आ.बी. खैरनार, संजय शिरसाट, श्रद्धा चव्हाण, गोपाल शार्दुल, मंजू देवरे, गणेश शिरसाट, भारती कुमावत, आरती शिंपी, अमोल कोल्हे, हर्षवर्धन खैरनार, गजानन वाघ यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.