मुंबई : वृत्तसंस्था
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. ८१ वर्षीय बिग बी यांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी समोर आली आहे. 2018 च्या ठग्स ऑफ हिंदोस्तान या चित्रपटात ॲक्शन सीन करताना त्यांना खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर नव्हती मात्र त्यांना बॉडी डबल वापरण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी हा सीन स्वतःच करण्याचा निर्णय घेतला.
2022 मध्ये कौन बनेगा करोडपती 14 च्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांच्या पायाची नस धातूच्या तुकड्याने कापली गेली होती. सेटवर स्नायूतून खूप रक्तस्त्राव झाला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अमिताभ यांनी 2020 मध्ये ट्विट करून माहिती दिली होती की त्यांना कोविडची लागण झाली आहे. त्यांचा मुलगा अभिषेकही पॉझिटिव्ह होता. बिग बी दोन महिने उपचारासाठी रुग्णालयात दाखल होते. यानंतर 2022 मध्येही अमिताभ यांना कोविडची लागण झाली.
अमिताभ बच्चन यांनी दिवाळीपूर्वीच पायाची नस कापल्याची माहिती दिली होती. त्यांच्या पायाची नस कापल्याने खूप रक्तस्त्राव झाल्याचे त्यांनी स्वतः एका ब्लॉगच्या माध्यमातून सांगितले होते. त्यांना रुग्णालयातही जावे लागले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या पायाला टाके घातले होते. 26 जुलै 1982 रोजी कुली चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन जखमी झाले होते. मार्शल आर्ट्समधील तज्ञ पुनीत इस्सारने ॲक्शन सीन दरम्यान त्यांना जोरदार मुक्का मारल्याने हा अपघात झाला. पुनीत इस्सारचा ठोसा पोटावर लागताच अमिताभ बच्चन जमिनीवर कोसळले. काही वेळाने ते उठले आणि म्हणाले की मला खूप वेदना होत आहेत. मनमोहन देसाई यांनी त्यांना तातडीने त्यांच्या हॉटेलमध्ये पाठवले. डॉक्टरही आले.