जळगाव : प्रतिनिधी
कुठल्या न कुठल्या कारणावरुन वाद घालणाऱ्यांकडून तिघांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. ही घटना दि. १२ मार्च रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास शासकीय कायटीआय शेजारी घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शासकीय आयटीआय शेजारी बाली करण कातोळी (वय २९) या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. दि. १२ मार्च रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे त्यांचे नातेवाईक शारदा मोरे यांनी त्यांच्या सासू व पुतण्या हा बाली कातोळी यांच्या सासू सोबत भांडण करीत होते. दरम्यान, त्यांचे पती हे भांडण का करत आहे अशी विचारणा केली असता, तिघांकडून महिलेस तिच्या पतीला शिवीगाळ करण्यात आली. तसेच शारदा मोरे या बाली कातोळी यांच्या अंगावर धावून येत त्यांना मारहाण केली. त्यानंतर बाली कातोळी या त्यांना अडविण्यासाठी गेल्या असता, आरती मोरे हीने तिच्या हातातील बॅट बाली कातोळी यांच्या डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. दरम्यान, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शारदा शिवदास मोरे, आरती सुनिल मोरे, सुनिल नथू कातोळी यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोहेकॉ पल्लवी मोरे या करीत आहे.