Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !
    राज्य

    आजपासून पेट्रोलच्या किमती घसरल्या : मोदी सरकारचा निर्णय !

    editor deskBy editor deskMarch 15, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने इंधनाच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी २ रुपयांनी कपात करण्यात आली आहे. दरम्यान, पेट्रोल-डिझेलचे दर कमी होताच तेल कंपन्यांनी इंधनाचे नवे दर जारी केले आहेत.

    तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार मुंबईत आज सकाळी ६ वाजेपासून पेट्रोलचा नवीन भाव १०४.१५ रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा भाव ९२.१० रुपये प्रतिलिटर इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे ९४.९२ रुपये आणि ८७.६२ रुपये प्रति लिटर इतके आहे. याआधी राज्य सरकारने जुलै २०२२ मध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेलचे दर ३ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आले होते. दरम्यान, आता पुन्हा इंधनाच्या दरात कपात करण्यात आल्याने कोणत्या शहरात, किती रुपयांना पेट्रोल-डिझेल मिळणार हे जाणून घेऊयात…

    मुंबईमध्ये आज पेट्रोलचे दर १०४.१५ रुपये प्रति लिटर, तर डिझेलचे दर हे ९२.१० रुपये प्रति लिटर आहेत.
    पुण्यामध्ये आज पेट्रोलच्या किंमती १०३.८४ रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किंमती ९०.७१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.
    नाशिकमध्ये आज पेट्रोलची १०४.१८ रुपये प्रति लिटरने विक्री होतेय. तर डिझेल ९०.४१ रुपये प्रति लिटर इतकं आहे.
    नागपुरामध्ये पेट्रोलची किंमत १०४.०४ रुपये आणि डिझेलची किंमत ९०.६३ रुपये प्रति लिटर एवढी आहे.
    छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०५.२१ रुपयांनी विक्री होतंय. तर डिझेल ९१.५७ रुपये प्रति लिटरने मिळतंय.
    अहमदनगरात पेट्रोलच्या किंमती या १०३.९६ रुपये प्रति लिटर अशा आहेत. डिझेलच्या किंमती ९१.४१ रुपये प्रति लिटर एवढ्या आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.