जळगाव आरटीओ विभागाचा भोंगळ कारभार उघड
लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांचे टोयोटा किर्लोस्कर कंपनीचे वाहनक्रमांक एम एच 19 सी झेड 5130 हे परस्पर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव आरटीओ कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची चौकशी सुरू आहे.
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय वामन सावकारे यांची टोयोटा कंपनीचीएम एच 19 सी झेड 5130 या वाहनाची नोंदणी 23 फेब्रुवारी 2019 रोजी जळगाव आरटीओ कार्यालयात झालेली आहे ही गाडी परस्पर डिसेंबर 2021 महिन्यात अनिल दत्तात्रय परब राहणार रविकिरण को ऑफ सोसायटी बांद्रा ईस्ट मुंबई यांच्या नावावर झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या वाहनांची परस्पर नोंद कशी झाली कोणी केली याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत .
यासंदर्भात आरटीओ कार्यालय जळगाव चे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले की सध्याला गाडी ट्रान्सफर करण्याचे ऑनलाईन एप्लीकेशन आहे त्यामध्ये ओटीपी बेस असल्याने ओटीपी हा गाडी मालकाचा मोबाईल नंबर वर जातो मात्र यामध्ये कोणीतरी आमदार सावकारे यांचा मोबाईल नंबर बदलविला असून हा नंबर कोणी बदलविला आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कोणी केले याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे कोणीतरी खोडसर पणे आमदार सावकारे यांची गाडी ट्रान्सफर केली आहे असे त्यांनी सांगितले. यानंतर ही गाडी कोणी ट्रान्सफर करू नये म्हणून तिला ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे याबाबत परिवहन आयुक्त यांना रिपोर्ट पाठवण्यात आला आहे या प्रकरणात त्यांची स्वतःची चौकशी सुरू असल्याचे सांगितले याप्रकरणाची चौकशी सखोल होण्यासाठी व तांत्रिक बाबी असल्याने पोलिसांकडे सुपूर्त करण्यात येऊ शकते असेही सांगितले.
भुसावळ विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय सावकारे यांची साठी गाडी परस्पर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आमदारांनी आरटीओ विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माझी गाडी मी विकलेली नाही माझ्याकडे आहे माझी गाडी परिवहन मंत्री यांच्या नावावर केली असल्याचे मला ही मीडियाच्या माध्यमातून कळाले होते मी यासाठी 30 रोजी आरटीओ अधिकारी यांना फोन लावला होता मात्र त्यांचा फोन बंद असल्याने आज सकाळी त्यांनी फोन करून हा प्रकार झाले असल्याचे कबूल केल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले.
एवढे मोठे धारिष्ट्य कोणी केले ते आमदारांची गाडी मंत्र्याच्या नावावर केली परस्पर करून टाकली ज्या गाडीवर लोन आहे ती गाडी दुसऱ्याच्या नावावर झालीच कशी असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला जेव्हा की सध्याला आरटीओ कार्यालयात असलेली डिजिटल पद्धती ही अतिशय फुलप्रूफ मानली जाते असे असतानाही असे होणे म्हणजे जळगाव आरटीओ कार्यालयात किती मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू आहे हे लक्षात येते असे आमदार संजय सावकारे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या प्रकरणी आमदार संजय सावकारे यांनी जळगाव येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची भेट भेट घेतली व या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली.