लाईव्ह महाराष्ट्र न्युज : विजय पाटील संपादक
रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांना भाजपने तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न भाजपकडे केला आहे. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची झालेल्या बैठकीमध्ये रक्षा खडसे यांची नणंद यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याची एकमत झाले असल्याची सूत्रांकडून विश्वसनीय माहिती मिळाली आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना घरामध्येच राजकीय पेच पुन्हा भाजपने निर्माण केला आहे. खडसे यांनी आधी लोकसभा निवडणूक लढवणार असे जाहीर केले होते. परंतु मंगळवारी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढविणार नाही असे जाहीर केले. आज त्यांची सून रक्षा खडसे भाजपकडून उमेदवारी जाहीर केली आहे.
बैठकीत रोहिणी खडसेंच्या नावावर एकमत
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांच्या नेत्यांची आज बैठक झाली यात रावेर लोकसभा मतदारसंघात रोहिणी खडसे-खेवलकर यांना निवडणुक लढविण्याबाबत एक मत झाल्याची विश्वसनी माहिती समोर येत आहे.
तर..नणंद भावजयाची दुसरी लढाई पाहण्यास मिळणार
राज्यात लोकसभा निवडणुकीची चुरस पाण्यास मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध बारामती मधून उमेदवारी देऊन नणंद भावजयाची लढाई पाहण्यास मिळणार आहे. त्यात रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांची सून भाजपच्या उमेदवार आहेत. तर खडसे यांचा कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी राष्ट्रवादीने दिल्यास पुन्हा नणंद भावजय अशी दुसरी लढत पाहण्यास मिळणार आहे.
खा.रक्षा खडसेंनी दिले आव्हान
रावेर लोकसभा मतदार संघासाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत रक्षा खडसे यांना संधी मिळाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे आ.खडसे व प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नावावर चर्चा सुरु असतांना रक्षाताई खडसे यांनी मैदानात कुणीही उमेदवार असले तरी मी पक्षाची एकनिष्ठ काम करणार असल्याची प्रतिक्रिया देत कडवे आव्हान दिले आहे.