यावल : प्रतिनिधी
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली. याच्या निषेधार्थ यावल व रावेर तालुक्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यांनी सामूहिक राजीनामे भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे सादर करीत संताप व्यक्त केला. यात जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, भाजपा सहकार आघाडी
जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, भाजपा ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष हर्षला पाटील, फैजपूर माजी नगराध्यक्ष् पांडूरंग सराफ, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष् सागर कोळी, व्यंकटेश बारी यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी राजीनामे दिले.