जळगाव : विजय पाटील
जळगाव लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांच्या ऐवजी अमळनेरच्या माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी भाजपने आज जाहीर केली. तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडून जळगाव मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे स्मिता वाघ यांना ठाकरे गटाकडून कोण टक्कर देणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागली आहे.
लोकसभा निवडणुकीत आज भाजपने दुसरी यादी जाहीर केली आहे. यात जळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी न देता त्यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात निवडणूक चांगलीच रंगणार असल्याची चर्चा आहे. विद्यमान खासदार पाटील यांना डावल्याने ते आता काय भूमिका घेता याकडे दिल देखील सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.
ठाकरे गटाकडून कोणाला देणार उमेदवारी
जळगाव लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी कडून ठाकरे गट लढवणार आहे. याबाबत मातोश्रीवर गेल्या पाच सहा दिवसात उमेदवारीची चाचणी करण्यात आली. तसेच अमळनेरच्या भाजपच्या ललिता पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. मात्र उमेदवारी बाबत ठाकरे गटाकडून निश्चित झाली नसलं याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून कुलभूषण पाटील हर्षल माने व अमळनेरच्या वैशाली सूर्यवंशी यांचे नाव चर्चेत होते.त्यामुळे स्मिता वाघ यांना कडवे आव्हान देण्यासाठी ठाकरे गट कोणाला रिंगणात उतरविता याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.