जळगाव : प्रतिनिधी
बंजारा स्पोर्ट फाउंडेशन संचलित बंजारा प्रीमियर लीगतर्फे समस्त बंजारा समाज एकत्र यावा या उद्देशाने समाजातील युवकांसाठी युवकांतर्फे तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेचे सागर पार्क मैदान येथे घेण्यात आली. या स्पर्धेत सेवालाल संघाने विजेतेपद पटकावले आहे.
८ मार्च रोजी स्पर्धेचे जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच समाजातर्फे महिलांना सन्मान देण्यासाठी दोन महिला युवतींना पुरुष संघ मध्ये स्थान देण्यात आले. हे तिसरे वर्ष असून, यावर्षी ८ संघ आपल्या संघ मालकांसह सहभागी झाले होते. यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मुख्य प्रायोजक रमेश चव्हाण, सह प्रायोजक, शैलेश पवार, आरती पवार, सह प्रायोजक सुभाष जाधव (माजी गटविकास अधिकारी) रवींद्र पवार, स्वामी एज्युकेशन ग्रुप रावेर, विनोद जाधव, आनंद पवार, हरिशश्चंद्र राठोड, मनोज जाधव, सागर राठोड, अजय राठोड, अनिल नाईक. आकाश राठोड विलास चव्हाण, बळीराम धाडी, रमेश चव्हाण, भारमल नाईक, भाऊल चव्हाण, किरण जाधव, अभिजित चव्हाण, अनिल राठोड, तुकडूदास नाईक. प्रेम जाधव, आत्माराम जाधव उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी काशिनाथ चव्हाण, सुनील नाईक, पपेश चव्हाण, बादल नाईक, अतुल चव्हाण विशाल चव्हाण यानी परिश्रम घेतले.
सेवालाल व भीमा नायक संघात झाला अंतिम सामना
क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेवालाल प्रतिष्ठान संघ व भीमा नायक सुपरस्टार संघ यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात सेवालाल संघाने भीमा नायक संघावर विजय मिळवला. त्यात जिल्ह्यातील सर्व बंजारा समाजातील खेळाडू युवकांनी सहभाग घेतला होता. हे सामने तीन दिवस-रात्र पद्धतीने पार पडले. प्रथम पारितोषिक सेवालाल प्रतिष्ठान संघ व द्वितीय पारितोषिक भीमा नायक सुपरस्टार संघाला व तृतीय पारितोषिक लक्ष्मण बापू यंगस्टास या संघाला मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.