Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्कार्फ अडकून मजूर महिलेचा मृत्यू
    क्राईम

    स्कार्फ अडकून मजूर महिलेचा मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    एमआयडीसीतील व्ही- सेक्टरमधील दालमिल कंपनीत काम करताना सरस्वती गोविंदा ठाकरे (वय- ३५, रा. सुहागी ता.खालवा जि. खंडवा ह.मु. जळगाव) या मजूर महिलेचा स्कार्फ मशीनच्या पट्ट्यात अडकल्याने गळफास लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विवाहिता पती गोविंदा नानू ठाकरे आणि तीन मुलांसह एमआयडीसीतील मुकेश अॅग्रो इंडस्ट्रीज या दालमिल कंपनीत गेल्या दोन वर्षांपासून काम करत असून तेथेच वास्तव्याला होत्या. नेहमीप्रमाणे मंगळवारी रोजी दुपारी २ वाजता जेवण झाल्यानंतर सरस्वती ठाकरे या कंपनीत कामावर हजर झाल्या, त्यावेळी मशीनमध्ये डाळ टाकत असताना त्यांच्या गळ्यात बांधलेला स्कार्फ हा मशीनच्या पट्ट्यात अडकला. त्यामुळे त्यांना गळ्याला फास बसला. हा फास एवढा घट्ट होता की, महिलेचे मुंडके धडापासून वेगळे झाले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना कळविण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे, बीट हवालदार ललित नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यांचे पार्थिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. मयत महिलेच्या पश्चात पती दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    माजी मंत्री खडसे अडचणीत येणार ? सरकारने दिले एसआयटी चौकशीचे आदेश !

    March 11, 2026

    १३ वर्षांपासून कोमात, गाझियाबादच्या तरुणाला सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक इच्छामृत्यू निर्णय

    March 11, 2026

    जेवणासाठी उतरले… अन् एसटी बस पेटली : ५० प्रवासी थोडक्यात बचावले

    March 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.