Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अजित पवार गटाला मोठा धक्का : नेता जाणार शरद पवार गटात
    राजकारण

    अजित पवार गटाला मोठा धक्का : नेता जाणार शरद पवार गटात

    editor deskBy editor deskMarch 11, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणार, असल्याची खात्रीलायक वृत्त आहे.

    लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

    अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा दमदार आमदार-फिक्स खासदार, असा उल्लेख करण्यात आला आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील निवडून आले होते. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची देखील मोठी ताकद आहे. त्यामुळे शरद पवार गटाने या जागेवर उमेदवार देण्यास तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निलेश लंके यांना अजित पवार गटाकडून लोकसभेची उमेदवारी हवी होती. मात्र, महायुतीत ही जागा भाजपच्या वाटेला जात असल्याने निलेश लंके नाराज झाले. त्यामुळेच त्यांनी शरद पवार गटात परतण्याचा निर्णय घेतलाय.

    दरम्यान, निलेश लंके पुन्हा पक्षात परतल्याने अहमदनगरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके विरुद्ध भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील असा सामना रंगण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे, आमदार रोहित पवार यांनी देखील या मतदारसंघात आमचा उमेदवार कोण असेल याची गोड बातमी देऊ, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.