लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील एमआयडीसी भागांमध्ये अवैधरीत्या बायो डिझेल ट्रक चालकांना विक्री करण्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईत 68 हजार 800 रुपयांचे बायोडिझेल व दोन वाहने व तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या सूचनेनुसार एमआयडीसी भागात अवैध बायोडिझेलची विक्री होत आहे त्याचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते या आदेशाप्रमाणे एम आय डी सी पोलीस ठाण्याचे प्रभारी अमोल मोरे पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे मुदस्सर काझी योगेश बारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे सूनील दामोदरे महेश महाजन विजय पाटील प्रमोद लाडवंजारी किरण धनगर पंकज शिंदे हेमंत पाटील विजय चौधरी यांनी एमआयडीसी भागात बलोरो पिक अप क्रमांक एम एच 19 एच 5715 या गाडीतून चोरट्या बायोडिझेलची विक्री ट्रक चल करण्यात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली एमआयडीसी भागात पेट्रोलिंग करीत असताना फातिमानगर श्रुबीराज इंडस्ट्रीज पीव्हीसी पाईप पोलिमर सेक्टर नंबर 119 बाजूला असलेल्या मैदानात ट्रक क्रमांक एमएच 19 झेड 25 11 या ट्रकमध्ये अनधिकृतपणे बायोडीजल भरताना मिळून आले याप्रकरणी दानिश शेख अन्वर शेख वय 23 मास्टर कॉलनी शोएब खान मंजूर खान मास्टर कॉलनी ट्रक चालक अली दय्यान अली 43 तांबापुरा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यांच्या ताब्यातून 68 हजार 800 रुपयांचे बायोडिझेल व दोन वाहने1450000 रुपये किमतीची जप्त करण्यात आली असून पुरवठा तपासणी अधिकारी डीबी जाधव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे