पारोळा : प्रतिनिधी
शहरातील दिल्ली दरवाजा येथील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ८:३०च्या सुमारास दिल्ली दरवाजाजवळ राहात असलेली नम्रता भास्कर फासगे (१६) ही पारोळा येथील एका खासगी शाळेत दहावीच्या वर्गात शिकते. सध्या ती परीक्षा देत होती. या युवतीने घरात कोणालाच काहीही न सांगता आपल्या घरातील लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने गळफास तयार करून आत्महत्या केली. परिसरात ही घटना कळताच तिला खाली उतरवून कुटीर रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. अलका निरमुळे यांच्या खबरीवरून पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.