Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
    क्राईम

    दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला; चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

    editor deskBy editor deskMarch 11, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    शहरातील आठवडी बाजारात दुचाकी लांबविण्याच्या प्रयत्नात असलेला चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. कागदपत्रे मागितल्यानंतर त्याच्याकडे मिळून आली नाहीत. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने आधीची चोरलेली दुचाकीही काढून दिली.

    मिळालेल्या माहितीनुसार, संशयिताचे नाव सायला मानसिंग बारेला (१८) रा. खाऱ्या काकोडा, ता. झिरण्या जि. खरगोन मध्य प्रदेश ह. मू गिट्टी मशीन खदान, उटखेडा रोड, ता. रावेर) असे आहे. अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी आठवडी बाजार असल्याने शहरासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने येतात. बाजारातून मोबाइल, इतर वस्तू चोरीला जाण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दुचाकीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शुक्रवारी दुचाकी घेऊन पलायन करीत असणाऱ्या एकाला गस्तीवर असलेल्या पथकाने कागदपत्रे मागितली अन् दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रावेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सोमवारी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.