जळगाव (प्रतिनिधी ) ;- आज 14 ऑगस्ट रोजी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातर्फे व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रामुख्याने विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थींचा सहभाग होता. कार्यशाळेत प्रा.सुरेश पांडे यांनी मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणारे संभाषण कौशल्य, वैशिष्ट्यपूर्ण वर्तन, संवाद कौशल्य या महत्वपूर्ण बाबींवर मार्गदर्शन केले. सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला असंख्य अडचणींवर मात करण्यासाचे सामर्थ्य निर्माण करतो म्हणून कठीण प्रसंगी न डगमगता सकारात्मक विचाराने वाटचाल करावी . विचारात खूप सामर्थ्य असते म्हणून चांगले विचार करा तसेच व्यक्तिमत्व घडण्यात संगतीचा खूप मोठा वाटा असतो म्हणून केव्हाही चांगले मित्र निवडा असे अनमोल मार्गदर्शन केले आणि सोबतच स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही सोपे मार्ग देखील सांगितले.या प्रसंगी दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.वासुदेव पाटील यांनी प्रा. सुरेश पांडे व अतिथी श्री. प्रदिप जोशी यांचे शिवप्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यशाळेचा समारोप प्रा. उमेश सुर्यवंशी यांनी केला. कार्यशाळेला प्रा.कपिलदेव कोळी,प्रा. ललित विसपुते व राजेंद्र वाघमारे यांनी सहकार्य केले.