चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार, आमदार यांच्यासह चार ते पाच हजार जमावांवर चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
याबाबत वृत्त असे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शहरातील सिग्नल चौकात काल दुपारी २ ते ४ वाजताच्या सुमारास करण्यात आले . यावेळी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, नगरसेवक राजेंद्र पाटील, नगरसेवक संजय पाटील, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक शेख चिरागउद्दीन रफिक उद्दोन शेख, नगरसेवक चंद्रकांत तायडे, फकिराबेन मिझा, कैलास पाटील व इतर चार ते पाच हजार अज्ञात जमावांवर शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस नाईक पंढरीनाथ पवार यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात कलम- १८८ प्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब) व मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१), (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि सचिन कापडणीस हे करीत आहेत.