जळगाव : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागातील दोन लिपिकांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. रायपूर ग्रामपंचायत निवडून आलेल्या सदस्याला ३ अपत्यबाबत दाखल तक्रारी संदर्भात चांगला अहवाल सादर करण्यासाठीच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची मागणी केली होती. या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत तक्रारदार हे निवडून आले होते. परंतु त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात तीन अपत्य असल्याने संदर्भात एकाने तक्रारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान ग्रामपंचायत विभागात कार्यरत असलेले महेश रमेशराव वानखेडे वय-३० आणि समाधान लोटन पवार वय-३५ या दोघांनी तक्रारदाराला तीन अपत्यबाबतचा चांगला अहवाल तयार करून देतो, त्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही, यासाठी ३० हजार रुपयांची लाचीची मागणी केली. दरम्यान तक्रार यांनी शनिवारी ९ मार्च रोजी लाचलुचपत विभागात तक्रार दिली. दरम्यान पथकाने सापळा रचून संशयित समाधान लोटन पवार हे ३० हजार पैकी २०हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
यांनी केली कारवाई
लाचलुचपत विभागाचे पोलीस उपाधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी, अमोल वालझाडे, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रणेश ठाकूर,राकेश दुसाने प्रदीप पोळ यांनी सापळा यशस्वी केला