लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : तालुक्यातील भादली खुर्द येथील शेतकऱ्याला काहीही कारण नसतांना सहा जणांना बेदम मारहाण करून खिश्यातील ५० हजारांची रोकडसह सोन्याची चैन आणि अंगठी जबरी लूट केल्याप्रकार घडला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहीती अशी की, निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) रा. भादली खुर्द ता. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेतकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शेतातील केळी तालुक्यातील किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केले होते. त्याचे पैसे घेण्यासाठी निवृत्ती साळुंखे हे दुचाकीने मंगळवारी २८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता किनोद येथे गेले होते. पैसे घेतल्यानंतर ते कठोरा गावाच्या मार्गाने भादली खूर्द येथे दुचाकी क्रमांक (एमएच १९ ७३६१) ने परतत होते. त्याच्यासोबत गावातील प्रकाश छबुलाल पाटील हे देखील होते. सायंकाळी सात वाजेच्या संशयित आरोपी सागर लक्ष्मण सपकाळे, दिक्षीत बळीराम सपकाळे, निलेश भगवान सपकाळे, जगदीश पुंडलिक सपकाळे, यशवंत गोकूळ सपकाळे, भूषण ज्ञानेश्वर पाटील रा. कठोरा ता. जि. जळगाव यांनी काहीही कारण नसतांना रस्ता आडविला. यातील एकाने लाकडी दांडा डोक्यावर टाकला. यात निवृत्ती हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी २९ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता निवृत्ती साळुंखे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि नयन पाटील करीत आहे.