जळगाव : प्रतिनिधी
मोहाडी रोडवरील शासकीय महिला रुग्णालयाच्या परिसरातून विविध प्रकारचा एक लाख २७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवार, ४ मार्च रोजी उघडकीस आली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी रोडवरील शासकीय महिला रुग्णालय परिसरातून २ ते ४ मार्चच्या दरम्यान चोरट्यांनी इलेक्ट्रिक बॅटऱ्या, सबमर्सिबल पंप, लोखंडी आसारी, इलेक्ट्रिक केबल चोरून नेल्या. एक लाख २७ हजार रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. आयुष मणियार यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों रामकृष्ण पाटील करीत आहेत