धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील गंगापुरी बु. ग्रामपंचायत तर्फे जन आरोग्य कार्ड तयार करून ते वितरित करण्यात येणार आहेत.
हे जन आरोग्य कार्ड बनविण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील कुटुंब प्रमुखांचा पासपोर्ट १ फोटो, आधार कार्ड झेरॉक्स प्रत व पूर्ण कुटूंबासाठी १५०/- रूपये फी. घेऊन सकाळी ०९ वाजता गावातील समाज मंदिर ओट्यावर पिंपळाच्या झाडाखाली हे कार्ड तयार करून मिळणार आहेत. ज्यांना कोणाला कार्ड काढायचे आहे त्यांनी हे कार्ड अवश्य काढा. हे कार्ड खाजगी दवाखान्यात वापरता येते. आरोग्य कार्ड पूर्ण परिवारा करिता आहे. आरोग्य कर्डात परिवारामधील अकरा लोकांची नावे टाकून मिळतात. आरोग्य कार्ड लगेच बनवून मिळेल. जन आरोग्य कार्ड नोंदणीत ओपीडी, आयपीडी बिलामध्ये सवलत मिळेल. तसेच अंध,अपंग, मुकबधीर यांना मोफत आहे तसेच यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व विनामूल्य प्रदान केली जाते.
ग्रामपंचायत तर्फे ही एक सेवाभावी योजना असून, या मागील हेतू हाच की सद्या दवाखाना प्रत्येकाच्या घरात आहे. (खाजगी हॉस्पिटल मध्ये २० – २५% बिला मध्ये सवलत मिळेल) यातून गोरगरिबांना लाभ मिळेल. जन आरोग्य कार्ड बनविण्याचे ठिकाण ग्रामपंचायत कार्यालय गंगा पुरी (पिंपळओटा गंगापुरी) हे आहे. तरी गावातील सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच हर्षाली महेश पाटील, उपसरपंच संगीताबाई सुरेश पाटील, सदस्य राधिका निंबा पाटील, भारती गोकुळ पाटील, रूपाली भाऊसाहेब पाटील, भागाबाई भगवान भिल, खंडू केवजी ब्राम्हणे यांनी केले आहे.