गडकिल्ले हेदाखविले आपले जीवन स्मारक आहेत त्यांना जीवित करणे गरजेचे आहे – छत्रपती खा संभाजी राजे भोसले
चाळीसगांव प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज हे योद्धे तर होतेच त्यासोबत राज्य कसे चालले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले, रयतेवर महिलांवर अन्याय अत्याचार केला त्यास शासन कसे करावे हे महाराजानी दाखवून दिले आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होत आहे हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण प्रसंगी केले
महाराष्ट्र मध्ये राहणारे टाटा, अंबानी, शिवभक्त, शिवप्रेमी यांना सोबत घेऊन किल्ले संवर्धन साठी फोर्थ फेडरेशन च्या माध्यमातून 300 पैकी 50 किल्यांचे संवर्धन करू त्यातून सर्व किल्ले जिवंत होतील गडकिल्ले हे आपले जीवन स्मारक आहेत त्यांना जीवित करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले.
आज दुपारी 2 वाजता येथील शिवाजी महाराज चौकातील राष्ट्रीय कन्याशाळेच्या प्रांगणात झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा अनावरण कार्यक्रमाप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की चाळीसगाव येथे पुतळा उभारणीसाठी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह नगरपालिका यांचे विशेष अभिनंद करत महाराष्ट्र राज्याचे एकाच दैवत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत अनाचार, दुराचार, अत्याचार संपवून रयतेला न्याय द्यायचा आहे अशी विचारांची प्रेरणा जिजाऊंनी शिवरायांना दिली आज त्या शिवरायांचे स्मारक अनावरण चाळीसगाव येथे होत असल्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी राजे पुढे म्हणाले की महाराष्ट्रराज्याची ओळख इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे, राजे, संत, थोर महापुरुषांची भूमी आहे. शिवरायांचा जयजयकार करायचा आणि आपल्याकडे पुतळाच नाही तर काय कामाचे शिवाजी महाराजानी आपले स्वराज्य हे सुराज्य व्हावे ही प्रतिज्ञा केली होती असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन प्रसंगी त्यावेळी आमदार उन्मेष पाटील यांनी शब्द घेतला होता महाराज तुम्हाला पुन्हा पुतळा अनावरण साठी यावे लागेल आणि तो शब्द त्यांनी व आमदार मंगेश चव्हाण नगरपालिका ने पूर्ण केला याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलताना सांगितले की मी महसूल मंत्री असताना पुतल्यासाठी लागणाऱ्या परवानगी दिल्या मात्र याचे श्रेय फडणवीस साहेबांना जाते असे सांगून पुतळ्यासाठी 40 वर्ष संघर्ष करावा लागला खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण सर्व सामाजिक संघटना, नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे त्यांनी कौतुक केले व आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले की आपण नशीबवान आहोत आजचा सोहळा हा शेकडो वर्षे दिसेल महाराजांनी 16 व्या वर्षी सुरुवात करून 50 व्या वर्षापर्यंत गडकिल्ले सर केले त्या राज्यांचा व महापुरुशांचा आदर्श घ्या असे सांगून खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांचे प्रयोग अभिनव आहेत यांची काम करण्याची पद्धत चांगली आहे याचा आम्हाला हेवा वाटतो असे कौतुक त्यांनी केले.
आमदार मंगेश चव्हाण यांनी बोलताना सांगितले की 2016 साली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना जो शब्द दिला होता तो पाळला चाळीसगाव चा स्वप्न स्पर्श असा आजचा दिवस आहे पहिल्यांदा खासदार, नगराध्यक्ष यांच्या माध्यमातून पुतळा झाला सोनेरी अक्षरात लिहिण्याचा आजचा दिवस आहे दुर्दैवाने काही लोकांनी याला राजकीय स्वरूप दिले नावासाठी नाही तर छत्रपती साठी काम करणारे आम्ही मावळे आहोत मला नेत्यांनी संधी दिली म्हणून आज मी जनतेची सेवा करीत आहे येणाऱ्या काळात चाळीसगाव येथे शिवसृष्टी चे काम सुरू होणार आहे आपण मुख्यमंत्री व उपस्थित मंत्री म्हणून येऊन लोकार्पण करावे असे सांगितले.
प्रास्ताविकातून नगराध्यक्ष आशालता चव्हाण यांनी पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला व मी नगराध्यक्ष असताना महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे याचा आनंद असल्याचे सांगितले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतल्यासाठी पाठपुरावा, आंदोलन, मागणी करणाऱ्या संभाजी सेनेचे लक्ष्मण शिरसाठ, समता सैनिक दलाचे धर्मभूषण बागुल, रयत सेनेचे गणेश पवार आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी खा रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, चांदुभाई पटेल, माजी आमदार स्मिता वाघ, साहेबराव घोडे, माजी मंत्री, एम के पाटील, प्रतिभाताई पाटील, जि प अध्यक्ष रंजनाताई पाटील, उपाध्यक्ष लालाचंदभाई पाटील, ज्ञानेश्वर माऊली, भाजप तालुका अध्यक्ष सुनील निकम, शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते.