Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अडकलेला पैसा आज पुन्हा मिळण्याची शक्यता
    राशीभविष्य

    अडकलेला पैसा आज पुन्हा मिळण्याची शक्यता

    editor deskBy editor deskMarch 5, 2024No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मेष
    दिवसाची सुरुवात खराब होईल. पण संध्याकाळ होईपर्यतं परिस्थिती सामान्य होईल. व्यापारात नरमगरम परिस्थिती राहील. प्रकृतीतही चढउतार राहील. चांगल्या बातम्याही मिळतील. प्रवासाची शक्यता आहे. व्यापारीवर्गाला आज प्रवास संभवतो. कामावर वेळेवर जा, उशिरा कामावर पोहोचल्याने त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी टाइमपास करणं टाळा.

    वृषभ
    नोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. कामातील सर्व अडथळे दूर होतील. तुमच्या कामात प्रगती दिसेल. अडलेली कामे मार्गी लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. तुमचे प्रेमसंबंध सुरू असतील तर तुम्हाला पार्टनरकडून चांगली बातमी मिळेल. पार्टनरशी भेट होण्याची शक्यता.
    मिथुन
    मित्रांसोबत वेळ घालवाल. अशावेळी खर्चही होईल. त्यामुळे खर्चापासून सावध राहा. कोणत्याही वादात अडकू नका. बाहेरचं खाल्ल्याने पोटाची समस्या उद्भवू शकते. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता. मन प्रसन्न राहील. चांगले योग जुळून येतील.

    कर्क
    घरात मोठी सरप्राईज मिळेल, त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. पार्टनरशी सूत जुळेल. काही नवीन गोष्टी घडून येतील. अप्रत्यक्षपणे खर्च वाढेल. तनाव राहील. दुसऱ्यांच्या भानगडीत पडू नका. कोणतीही रिस्क घेऊ नका. सतर्क राहा. तुमच्या चुकीमुळे तुमचे विरोधक वाढतील.

    सिंह
    घरात भांड्याला भांडं लागेल. छोट्यामोठ्या कारणांमुळे कुरबुरी वाढतील. त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा. बोलण्यापूर्वी विचार करा. नात्याला महत्त्व द्या. गुंतवणूक चांगली कराल. बचत करण्यावर भर द्याल. लोकांशी संबंध चांगले राहतील. व्यवसायात बरकत येईल.

    कन्या
    तुमच्या प्रत्येक कामात भावंडांची साथ मिळेल. तुमच्या मनावरचा बोजा त्यामुळे कमी होईल. घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. पण कोणत्या तरी गोष्टीची तुम्हाला चिंता जाणवेल. मालमत्तेच्या व्यवहारात तुम्हाला लाभ मिळेल. प्रगतीचे दरवाजे उघडतील. व्यापारात नुकसान होण्याची शक्यता आहे. कामावर जाताना अचानक तब्येत बिघडेल. मळमळ जाणवू लागेल. त्यामुळे आराम करा.

    तुळ
    कुटुंबासोबत बाहेर जाऊन खाण्याचा बेत कराल. त्यामुळे आजचा दिवस संस्मरणीय ठरेल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आईची तब्येत अचानक बिघडण्याची शक्यता आहे. नोकरी-धंद्यात बरकत राहील. अचानक आजार उद्भवू शकतात. कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. नाही तर मोठं नुकसान होऊ शकतं. पण आज मानसिक समाधान राहील. आनंदी वातावरण राहील.

    वृश्चिक
    आजचा दिवस तुमच्यासाठी लकी आहे. जे काम कराल त्यात प्रगती मिळेल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. धंद्यात नवी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. प्रवास योग जुळून येतील. मात्र, तब्येतीच्या तक्रारी उद्भवू शकतात. त्यामुळे काळजी घ्या. बाहेरचं खाणं टाळा. कुणावरही अतिविश्वास टाकू नका. लोक तुम्हाला गृहित धरण्याची शक्यता आहे.

    धनु
    ऑफिसमधील सहकाऱ्यांशी क्षुल्लक कारणावरून वाद होईल. तुम्ही ऑफिसच्या राजकारणाचे बळी ठरू शकता. त्यामुळे संयम बाळगा. तुमच्याकडून चूक होणार नाही याची काळजी घ्या. बोलताना जपून बोला. गॉसिप करू नका. हातातील सर्व कामे पूर्ण होतील. सहकारी मदत करतील. उत्पन्न वाढेल. प्रवासाचाही योग आहे.

    मकर
    आज अचानक जुन्या मित्राची भेट होईल. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळून दिवस प्रसन्न जाईल. ज्या ठिकाणी कधीच गेला नाही, अशा ठिकाणी जाण्याचा प्लान कराल. पार्टी किंवा पिकनिकमधून आनंद मिळेल. बौद्धिक कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी आणि रोजगारात प्रगती होईल. आज तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल.

    कुंभ
    जुन्या आजारातून बरे व्हाल. आज तुम्हाला ताजतवानं वाटेल. अचानक गिफ्ट मिळण्याची शक्यता. जुने मित्र आणि ओळखीचे लोक भेटतील. चांगल्या गोष्टी कानावर येतील. मन प्रसन्न राहील. घरातील वातावरणही चांगलं राहील. व्यवसायात अनुकूल गोष्टी घडतील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. विद्यार्थ्यांनी मेहनत केल्यास चांगलं फळ मिळेल.

    मीन
    व्यवसायात चांगली डील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना तुमचं आव्हान वाटेल. मन साफ ठेवा. तुम्हाला यश मिळेल. कामात मन लागणार नाही. वादापासून अलिप्त राहा. मेहनत करा. आळस करू नका. ठरवलेलं काम पूर्ण होणार नाही. पण निराश होऊ नका. पुन्हा प्रयत्न करा. आयुष्यात सर्व गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. पण सर्वच गोष्टी मनाविरुद्ध होतील, असंही नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जर तुम्ही तुमचा व्यवसाय स्थलांतरित करण्याचा विचार करत असाल, तर त्या ठिकाणाकडे नीट लक्ष द्या.

    January 25, 2026

    अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे शहाणपणाचे ठरेल. आज तुमची खास इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

    January 24, 2026

    आज तुमचा व्यवसाय फायदेशीर राहील. पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा.

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.