नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक राजकीय नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकी येत असतांना आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देखील बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
राजीव गांधींप्रमाणे बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांच्या माहितीनंतर केंद्रीय गृह मंत्रालयाकडून राहुल गांधी यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ८ दिवसांपूर्वी नाशिक पोलिसांना फोनद्वारे मिळाली होती माहिती. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान हल्ला होईल, असा नाशिक पोलिसांना फोन आला होता. दरम्यान फोन करणारा व्यक्ती माथेफिरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं असून चौकशी सुरू आहे.