जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल जामनेर तालुक्यात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे पपई, कांदा, टरभूजसह गहू, हरभरा, दादर, मका पिकांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली असून पंचनामे करुन भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
चोपडा तालुक्यातील पश्चिम भागातील वढोदा येथे १ मार्चला दुपारी ३.३० वाजता अचानक आलेल्या बेमोसमी पाऊस व वादळी वाऱ्याने अवघ्या १० ते १५ मिनिटात पपई, मका, केळी पिकांचे नुकसान झाले. वढोदा येथील छगन बळीराम पाटील या शेतकऱ्याचे कापणीवर आलेल्या ३०० पपईचा बाग उध्वस्त झाल्या असून पूर्ण बाग वाऱ्याने उन्मळून गेली आहे. यात प्रताप हिरामण पाटील, वासुदेव पाटील, योगराज पाटील, किशोर पाटील, सतीश पाटील, घुसळू पाटील, विश्वनाथ पाटील, निंबा पाटील, विलास पाटील तर शेखर गोकुळ पाटील यांची केळी बागेतील सुमारे ३०० झाडे उन्मळून पडली आहेत.
जास्त प्रमाणात मका व पपईचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वर्डी, ता. चोपडा येथे १ मार्चला दुपारी ४ वाजेला विजांच्या गडगडासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. अचानक आलेल्या चक्रीवादळासह पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात काढणीला असलेल्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, मका, दादर तसेच फळबागांचे ही नुकसान झाले आहे. या पिकांची पाहणी करून पंचनामा करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. दरम्यान, चोपडा ते यावल महामार्गवरील मंगरूळ फाट्याजवळ मोठे झाड महामार्गातच उन्मळून पडल्यामुळे दोन्हीकडील वाहतूक १ तापस ठप्प झाली होती. वडींचे पोलीस पाटील पद्माकर नाथ, अडावद पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तत्काल यावर नास्थळी माजूक सुरकूत 1 करण्यासाठी प्रयत्न केले.