जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरून परिसरात जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमाराचा उघडकीला आला आहे. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी १ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील मेहरून परिसरात संशयित आरोपी दादू सोनवणे याने जुन्या वादातून एकावर गोळीबार केल्याचा खळबळजणक प्रकार समोर आला आहे. दरम्यान ही घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या, पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पुढील कारवाईला सुरुवात करत आहे. दरम्यान गेल्या ३ दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या भागातून गावठी पिस्तूल हस्तगत करण्याची घटना समोर आले आहे. यातच आता मेहरून परिसरात दोन जणांनी गोळीबार केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा गोळीबार कोणत्या कारणामुळे करण्यात आला याबाबत आत्तापर्यंत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.