जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीला शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर नेऊन तिच्यावर भुसावळ तालुक्यातील खेडी येथे अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात १४ वर्षे अल्पवयीन मुलगी राहते. संशयित आरोपी हर्षल दीपक सोनवणे (वय २१, रा. भुसावळ) याने पीडित मुलीला १ जानेवारी रोजी जळगाव शहरातील एका विद्यालयाच्या गेटजवळून दुचाकीवर बसवून भुसावळ तालुक्यातील खेडी गावात नेले. त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केल्याची घटना १ जानेवारी रोजी उघडकीस आली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी बुधवारी शनिपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.
त्यानुसार संशयित आरोपी हर्षल सोनवणे (वय २१) याच्या विरोधात शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी संशयित आरोपी हर्षल सोनवणे याला अटक केली आहे.