• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून २०० जणांना विषबाधा

editor desk by editor desk
February 29, 2024
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
धक्कादायक : हळदीच्या कार्यक्रमात जेवणातून २०० जणांना विषबाधा

अहमदनगर : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक गावात सध्या लग्नाची धामधूम सुरु असतांना अशाच एका लग्नाच्या अगोदर असलेल्या हळदीच्या कार्यक्रमातील जेवणातून तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात बुधवारी दि.२८ रात्रीच्या सुमारास घडली. जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय.

विषबाधा झालेल्यांमध्ये ७ बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. या घटनेनं अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील मवेशी करवंदरा गावात बुधवारी नवरदेवाच्या घरी हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवरदेवाच्या नातेवाईकांसह गावातील काही मंडळींसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, जेवणानंतर रात्री अनेकांना जुलाब आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. प्रकृती खालवत असल्याने 200 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यापैकी 59 लोकांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात तर काहींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. विषबाधा झालेल्या व्यक्तींमध्ये ७ बालकांचा देखील समावेश आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन रुग्णांना मदत करण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. अति गंभीर रुग्णांना तातडीने नाशिक, संगमनेर येथे हलविण्यात आले आहे.

Previous Post

चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे अटकेत

Next Post

भीषण अपघात : १४ ठार तर २१ गंभीर जखमी !

Next Post
भीषण अपघात :  १४ ठार तर २१ गंभीर जखमी !

भीषण अपघात : १४ ठार तर २१ गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !
क्राईम

शिव कॉलनीनजीक भरधाव चारचाकीने पादचाऱ्याला चिरडले !

June 1, 2025
जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !
क्राईम

जामीनावर बाहेर आल्यावर पुन्हा रणजित कासलेला ठोकल्या बेड्या !

June 1, 2025
जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त  !
क्राईम

जळगावात १३ हजारांचा गांजा जप्त !

June 1, 2025
व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !
राज्य

व्यावसायिकाना आनंदाची बातमी : एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती घसरल्या !

June 1, 2025
महिलेला मारहाण करीत छळ ; सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल !
क्राईम

चारित्र्यावर संशय : सासरच्यांकडून विवाहितेचा छळ !

June 1, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

प्रभात चौकात अपघात : दुचाकीस्वार गंभीर जखमी !

June 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group