जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये दि.२६ रोजी पडलेल्या अवकाळी पावसाने झोडपल्याने तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले, सुलतानी संकट तर आहेच पण कालचा अस्मानी संकटांने हाता तोडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. यावर आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तत्काळ पंचनामा करावा असे आदेश देखील दिल्याचे समोर आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा तालुक्यात रात्री अवकाळी पावसासह गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी केली. तर झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दि २६ रोजी रात्री तालुक्यातील तामसवाडी, बोळे, वसंतवाडी, टोळी, मोंढाळे, प्र अ बहादरपुर, तामसवाडी, बोळे, या परिसरात रात्रीच्या सुमारास पावसासह गारपीटीने तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गहू, मका वादळ वाऱ्यासह गारांच्या पावसामुळे आडवा पडला असल्यामुळे शेतकऱ्यांवर हंगाम कापणीवर असताना अवकाळीने संकट ओढवले आहे.
दि. २६ रोजी रात्री ९ ते ९. ३० वाजेच्या सुमारास पारोळा तालुक्यात गारांचा पाऊस झाला, बोरांच्या आकाराची गार पडली. पारोळा तालुक्यात तामसवाडी, बोळे, वसंतवाडी, टोळी, तरडी, शेवगे या भागातरात्री ९ ते ९. ३० वाजेच्या सुमारास काही वेळ गारपीटीचा तडाखा झाला. तसेच पारोळा तालुक्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार वादळ वाऱ्यासह हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली . नुकसानभरपाईची मागणी अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले आहे. म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीने त्वरित सरसकट या भागात नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे