पुणे : वृत्तसंस्था
प्रत्येक परिवारात छोट्या मोठ्या कारणाने भांडण होत असतात, नुकतेच पुणे शहरात देखील एका परिवारात अशीच भांडणाची सुरुवात झाली मात्र हे भांडण इतक्या टोकाला गेले कि थेट पत्नीने पतीवर चाकूने हल्ला केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.25) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील पत्र्याच्या चाळीत घडला आहे.
याबाबत जखमी रमेश बबन ससाणे (वय-43 रा. पत्र्याची चाळ, भवानी पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन जया रमेश ससाणे (वय-34 रा. भवानी पेठ, पुणे) हिच्यावर आयपीसी 324 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी पती-पत्नी आहेत.रविवारी सायंकाळी रमेश ससाणे हे कामावरुन घरी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी जयाने त्यांच्याकडे 500 मागितले. पैसे न दिल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जया जेवण वाढत असताना रमेश यांनी ताट आणि तांब्या आपटला. तसेच तिला कानशिलात लगावली. या कारणावरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात जयाने रमेश यांच्या दंड आणि पाठीवर चारूने वार करुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार भोसले करीत आहेत.