• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अँड रोहिणी खडसे (खेवलकर) यांच्या गाडीवर हल्ला !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
December 27, 2021
in क्राईम, मुक्ताईनगर
0
अँड रोहिणी खडसे (खेवलकर) यांच्या गाडीवर हल्ला !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज | जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणीताई खडसे यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना आज रात्री घडली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुक्ताईनगर मतदारसंघात माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील आणि जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याशी शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन आणि गैरवर्तणुक केल्याने या वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसा आधीच राष्ट्रवादीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. तर शिवसेना पदाधिकार्‍यांनीही निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर मुक्ताईनगरात फेसबुकवरील कॉमेंटच्या माध्यमातून झालेल्या वादात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत. यातच रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटलांना चोपण्याची भाषा केल्याने वादवाढला आहे. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काल तर रोहिणी खडसे यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात आले. यातच आज खुद्द आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला.

या पार्श्‍वभूमिवर, आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास रोहिणी खडसे या मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असतांना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. याप्रसंगी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा ड्रायव्हर होता. यात कोयत्याच्या मदतीने त्यांच्या गाडीच्या काचांवर आघात करण्यात आले. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना काही दुखापत झाली नाही. मात्र हल्लेखोर काही क्षणात फरार झाले. हे हल्लेखोर पाच जण असून त्यांच्याकडे लोखंडी रॉडसह शस्त्रे असल्याचे दिसून आले आहे.

Previous Post

धक्कादायक: पत्नीने पतीचा खून केल्याची उकल वर्षभरानंतर !

Next Post

नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

Next Post
नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने  अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

नात्याला काळीमा फासणारी घटना ; काकाने अपहरण करून 11 वर्षे लुटली अब्रू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group