मुंबई : वृत्तसंस्था
ज्येष्ठ गायक पंकज उदास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उदास यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले आहे. वयाच्या 72 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पंकज उधास यांना 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. गायकाच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
पंकज उधास यांचा जन्म १७ मे १९५१ रोजी गुजरातमध्ये झाला होता. 1980 ते 1990 च्या दशका ते भारतातील सर्वात लोकप्रिय गझल गायक बनले. त्यांनी त्यांच्या मधुर आवाजाने भारतीयांचे मन जिंकले होते. भारतातच नाही तर परदेशात देखील त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे. संगित विश्वातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कारही देण्यात आले होते.