भडगाव : प्रतिनिधी
वाक गावाजवळील गिरणा नदीपात्रात उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शनिवारी कारवाई करत बेकायदेशीर वाळूउपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ५ ट्रॅक्टर, २ जेसीबी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी १० जणांविरोधात पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदीपात्रात वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी व भडगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या ठिकाणावर मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील (४१, वडगाव सतीचे, ता. भडगाव), अक्षय देवीदास मालचे (२०), प्रवीण विजय मोरे (२०), मच्छिंद्र गिरधर ठाकरे (२१), ललित रामा जाधव (२२), शुभम सुनील भिल (२१), रणजीत भास्कर पाटील, रवी पंचर, गणेश मराठे आणि भोला गंजे (भडगाव) यांच्याविरोधात पोकॉ. राहुल महाजन यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सपोनि तुषार देवरे, पोना राजेंद्र निकम, पोहेकों भगवान पाटील, विकास पाटील, विश्वास देवरे, महेश बागुल, चेतन राजपूत, सुनील मोरे, श्रीराम कांगणे, समाधान पाटील, राहुल महाजन, पोकों सुदर्शन घुले यांनी केली