जळगाव : प्रतिनिधी
शहरामध्ये शनिवार दि. २४ रोजी सकाळी एक इसम गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तपास केला. गणेश कॉलनी जवळ बजरंग बोगद्यापाशी एका तरुणाला तीन गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसासह् स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गणेश कॉलनी रोड भागातील बजरंग बोगदयाजवळ एक संशयीत ईसम मोटार सायकलीवर पिस्तुल बाळगत फिरत असल्याची गोपनीय माहीती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सदर इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. संशयित आरोपी किशोर रामदास कोळी (वय ३० रा. काचन नगर, जळगाव) याच्या ताब्यातून मोटारसायकलच्या शिटखाली अंदाजे १,३१,००० रु किमतीचे एकुण ०३ गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगझीनसह व एकुण ०४ जिवत काडतुस मिळून आले. त्याची दुचाकीदेखिल् जप्त करण्यात आली आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेवुन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी मोरे हे करीत आहे.
यांनी केली कारवाई
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप गावीत, पोनी नजन पाटील, सपोनि अमोल मारे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि. गणेश चौभे, विजयसिग पाटील, विजय पाटील, सचिन महाजन, अक्रम शेख, महेश महाजन, कीरण चोधरी, सुधाकर आभोरे, प्रितम पाटील, इश्वर पाटील, मपो प्रियंका कोळी अशा पथकाने केली.