लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील कॅफेत संदर्भात वृत्त वाहिनीवर बातमी चालविल्याने जेष्ठ पत्रकार आनंद शर्मा यांना धमकविणाऱ्या व्यक्तींवर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक याना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शहरातील गणपती नगर रस्त्यावर असलेल्या मार्व्हल कॅफेत प्रेमीयुगलांसाठी विशेष व्यवस्था असून त्याठिकाची माहिती पोलिसांना मिळाली होती. सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली. कॅफेत दोन युगल देखील मिळून आले. संबंधित कॅफे चालकावर कारवाई देखील करण्यात आली. संबंधित प्रकरणाची माहिती आणि अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असलेले वृत्त इंडिया आपतक चॅनलने प्रसारित केले होते. नंतर संपादक आनंद शर्मा यांना सदर व्हिडीओ वृत्त हटविणे संदर्भात किंवा कारवाई करण्याची धमकी देणारे दोन फोन मोबाईल क्रमांक +918806301500 (पहिला फोन) व +918856061322 (दुसरा फोन) यावरून आले होते.पत्रकार यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या बातमीच्या आधारे ते वृत्त प्रसारित करण्यात आले होते. ज्या नंबर वरून पत्रकारांना धमक्या देण्यात आले त्या नंबरची सखोल चौकशी करून त्या व्यक्तींवर, संबंधित कॅफे चालक-मालक यांच्यावर कठोर कारवाई करावी आशा मागणीचे निवेदन आज पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुडे याना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी दिले.