रावेर : प्रतिनिधी
रसलपूर रस्त्यावरील विनायक महाजन यांच्या घरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोकड, मोबाइल, दुचाकी असा एकूण ५ लाख ८१ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रावेर पोलिसात १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फैजपूरच्या सहायक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या नेतृत्वाखाली फौजदार सुनील पाटील, पोहेकों गणेश मनुरे, पोकों सुमीत बाविस्कर, हसन अली यांच्या पथकाने ही कारवाई केली. रसलपूर रस्त्यावर विनायक सुनील महाजन (रा. बक्षीपूर, ता. रावेर) याच्या घरात जुगार खेळला जात होता. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिस पथकाने धाड टाकली. त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, १७ हजार ९० रुपयांची रोकड, ५४ हजार २०० रूपये किमतीचे आठ मोबाईल, ५ लाख १० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी असा एकूण ५ लाख ८१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हवालदार गणेश प्रल्हाद मनुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरमालकासह १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.
यांना पकडले रंगेहात
जुगार खेळणारे मुस्तफा नामदार तडवी (वय ५०, रमजीपूर, ता. रावेर) गणेश छगन पवार (३०, आभोडा, ता. रावेर), जुबेर रफीक शेख (१८, इमामवाडा, रावेर), फिरोज जुम्मा तडवी (२५, आभोडा, ता. रावेर), सलीम बाबू तडवी (३६, आभोडा, ता. रावेर), आदिल खान सलीम खान (२४, इमामवाडा, रावेर), समाधान सोमा महाजन (४४, रसलपूर, ता. रावेर), किसन पवार (४५, आभोडा, ता. रावेर), सतीश रामदास शिरतुरे (४६, सिद्धार्थ नगर, रावेर), अल्ताफ रशीद खान (२३, भोईवाडा रावेर), सुधाकर दयाराम महाजन (वय ३०, जुना सावदा रोड, रावेर), रमजान सुपडू तडवी (२५, रा. रसलपूर, ता. रावेर), शुभम महाजन (२६, बक्षीपूर, ता. रावेर), दिलीप धनराज न्हावी (४०, नागझिरी चौक, रावेर) यांना रंगेहाथ पकडले.