ठाकरे गटाचे पालकमंत्रीना आव्हान; जळगाव ग्रामीण मधून सुनील महाजन निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक..!
जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघांमध्ये ही आता राजकीय गणिताला वेग आला आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन विधानसभेसाठी निवडणूक लढणार आहेत. पक्षाने आदेश दिल्यानंतर ते जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात देखील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.
आगामी लोकसभा निवडणूकानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे प्रतिष्ठित नेतेमंडळी गुडघ्याला बाशिंग बाधून तयार असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे. आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सुनिल महाजन यांच्या पत्नी माजी महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषद घेवून आमदारकी लढविण्याची तयारी दर्शविली. तर दुसरीकडे त्यांचे पती सुनिल महाजन हे मात्र जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून उबाठाच्या वतीने उमेदवारी मिळाली तर आमदारकीची निवडणूक लढविणार असल्याचा हिरवा कंदील दिला आहे.
देशभरात आता आगामी निवडणूकांचा पडघम सुरू आहे. गेल्या दीड वर्षात राज्यातील राजकरणाला वेगळेच वळण लागले आहे. सुरूवातील शिवसेना फूटून शिंदे गट तयार झाला. बाळासाहेबांची शिवसेना हा पक्ष स्थापन करून एकनाथ शिंदे यांनी भाजपा सोबत राज्यात सत्ता मिळाविली. कोर्टाने खरी शिवसेना ही शिंदे गटाची असल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. हे प्रकरण शांत होत नाही तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अशीच फूट पडून अजित पवार गट निर्माण झाला. न्यायालयाने तोच कित्ता गिरवत अजित पवार यांच्या बाजून निकाल दिला. हा निकाल मात्र आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दिला आहे अशी चर्चा आहे.
राजकारणात सामाजिक मतदानाला मतदार संघामध्ये महत्त्वाचे मानले जाते. जळगाव ग्रामीणचे सामाजिक गणित पाहता जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ४० हजार लेवा पाटील मतदार आहे. सुनील महाजन हे या पाटील समाजाचे असून त्यांचा समाजामध्ये तसेच इतर समाजामध्येही चांगला जनसंपर्क आहे. त्यामुळे त्याने देखील जळगाव ग्रामीण मधून शड्डू ठोकला आहे. गेल्या काही महिन्यापूर्वी विधान सभेच्या सर्वेक्षणात त्याच् देखील नाव होते.
ग्रामीण मतदारसंघात दौरे सुरू…
सुनील महाजन व त्यांच्या पत्नी माझी महापौर जयश्री महाजन यांनी ग्रामीण मतदार संघात भेटी देखील सुरु केल्या आहेत.जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक पदावर देखील आहेत तो देखील त्यांना फायदा होऊ शकतो.
आदेश आल्यास लढणार..!
लाईव्ह महाराष्ट्र न्यूजने त्यांना प्रश्न विचारल्यावर तुम्ही जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातूनन लढणार का ? त्यावेळी त्यांनी सांगितले की उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जो मला आदेश येईल तो मला मान्य असेल आणि मी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून देखील लढेल, असे त्यांनी सांगितले.