चाळीसगाव : प्रतिनिधी
पोलिस दलास हादरा देणाऱ्या चाळीसगाव येथील रहिवासी व मुंबई पोलिस दलातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
कोळी याने जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर २१ रोजी न्यायमूर्ती मोहिते यांच्या न्यायालयात कामकाज चालले. यात आगोणे खून प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णा उर्फ आनंदा चिंधा कोळी यांचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नामंजूर करण्यात आला. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून पंढरीनाथ पवार यांनी बाजू मांडली, आरोपींकडून प्रकाश पाटील यांनी तर फिर्यादी पक्षाकडून कैलास आगोणे यांनी बाजू मांडली.