धरणगाव लक्ष्मण पाटील : येथील पष्टाणे गावातील ग्रामस्थांनी जाती – पाती भेद विसरून एकाच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा ठराव एकमताने संमत करून ऐतिहासिक निर्णय २३/१२/२०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घरकुल ड यादी एकही नाव न वगळता पहिल्या ७ लोकांना प्राधान्य देण्यात आले. तसेच येणाऱ्या १ जानेवारी २०२२ या नवीन वर्षापासून यापुढे होणारे सर्व अंत्यविधी सोनवद रोड कडील बांधकाम असलेल्या स्मशातभूमीत होतील. नवीन वर्षात त्या स्मशानभूमीत मुरूम टाकून भर करून रंगकाम व डागडुजी करून रिपेरिंग करण्यात येईल. यापुढे उखळवाडी रस्त्यालगत असणाऱ्या स्मशानभूमीत कोणीही अंत्यविधी करणार नाही. येणाऱ्या ३१ डिसेंबर नंत्तर तिला पाडण्यात येईल तसेच सुरेश केशव पाटील यांच्या शेतातील सुतार समाजाची व धोबी समाजाची स्मशानभूमी तेथे अंत्यसंस्कार न करता तेही समाज बांधव यापुढे सोनवद रोड कडेचं अंत्यसंस्कार करतील, असा ऐतिहासिक निर्णय आज सर्वानुमते घेण्यात आला.
आयत्या वेळी आलेला विषय तंटामुक्ती अध्यक्ष कोण? यावरून विषयावर चर्चा झाली असता ग्रामसभेत फक्त एक ग्रामस्थ इच्छुक असल्यामुळे त्यांना तंटामुक्ती अध्यक्ष करण्यात आले. देविदास हिरालाल पाटिल यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आजची ग्रामसभा शांततेत पार पडली. ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीला सार्थ ठरवत पष्टाणे गावाने एक चांगला आदर्श यानिमित्ताने घालून दिला, असंच म्हणावं लागेल.