जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविले. ही घटना दि. १८ रोजी उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. ही मुलगी घरात एकटीच असतांना तीला दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी तीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तरी देखील ती मिळून न आल्याने अखेर त्यांनी दि. १९ रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.