धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव येथील मातोश्रीनगर येथे सावित्रीबाई फुले या उद्यानामुळे परिसरातील नागरिकांना चांगले आरोग्य व मन: शांतीसाठी हे उद्यान उपयोगी पडेल तसेच या उद्यानामुळे निसर्ग सौंदर्यात भर पडली असून सर्वांनी याचा काळजी पूर्वक वापर करावा. मातोश्री नगर मध्ये होत असलेल्या सर्वसमावेशक कार्याचे कौतुक केले. आयुष्यात जीवन सुकर होण्यासाठी अशीच एकजूट कायम ठेवां. माजी नगरसेवक अभिजीत पाटील यांनी हमालवाडा परिसरात कोणत्याही निधीची वाट न पाहता स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याची व्यवस्था या उपक्रमाचे पालकमंत्री यांनी कौतुक केले. या भागातील उद्यान सुशोभीकरण व काँक्रीटीकारणासाठी ३० लाखाचा निधी उपलब्ध करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
धरणगाव येथील मातोश्री नगर येथे ओपन स्पेस मध्ये “सावित्रीबाई फुले “ उद्यानाचे लोकार्पण व हमालवाडा परिसरात अभिजित पाटील यांनी स्वखर्चाने येथील नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात केलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले . सर्वप्रथम मातोश्री नगर येथील जेष्ठ नागरिक , युवकांनी व महिला मंडळामार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नुकतेच सेवानिवृत्त झालेले सैनिक पुष्पराज पवार , सेवानिवृत्त शिक्षक यु.एस बोरसे, डी.के. चौधरी, संजय पाटील, विवेकानंद सूर्यवंशी, तसेच गुणवंत विद्यर्थी कृष्णराज चौधरी यांचा यथोचित सत्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी केले. सूत्रसंचालन अनिल पाटील सर यांनी केले तर आभार डी. एस. बेलदार सर यांनी मानले. सेवानिवृत्त शिक्षक धनराज पाटील गुरुजी, उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर यांनी मनोगत व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख पी.एम.पाटील सर , नगरसेवक पप्पू भावे, चर्मकार संघटनेचे , भानुदास विसावे, विजय महाजन, वासुदेव चौधरी, शहरप्रमुख विलास महाजन, अहमद पठाण सुरेश महाजन, भीमराव पाटील, नंदकिशोर पाटील, युवसेनेचे संतोष महाजन , बुट्या पाटील, संजय चौधरी, दिलीप महाजन , रामाराव भदाणे, जेष्ठ नागरिक धनराज पाटील, भिकन पाटील, आर. बी. पाटील सर, डॉ. संजय पाटील, जालंदर पाटील, डी.एच. कोळी सर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या