• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग : शिंदेंच्या खासदाराचा दिल्लीत अपघात

editor desk by editor desk
February 19, 2024
in क्राईम, राजकारण, राज्य
0
ब्रेकिंग : शिंदेंच्या खासदाराचा दिल्लीत अपघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशभरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची धामधूम सुरु असतांना आता देशाच्या राजधानीमध्ये राज्यातील एका खासदाराच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्यातील शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा राजधानी दिल्लीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात हेमंत गोडसे यांना गंभीर दुखापत झाली नाही, मात्र गाडीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे आज राजधानी दिल्लीमध्ये आहेत. नवी दिल्लीमधील संसदेतील शिव जयंती उत्सव आटोपून हेंमत गोडसे हे आपल्या इनोव्हा कारमधून (क्र. MH 15 FC 9909) निवास्थानी जात होते. यावेळी दिल्लीतील बी डी मार्गावर त्यांच्या गाडीला एका भरधाव ईर्टिगा कारने (DL 7CW 2202) जोरदार ध़डक दिली. या अपघातात खासदार हेमंत गोडसे हे सुखरुप आहेत. त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही, मात्र त्यांच्या इर्टिगा कारचे मोठे नुकसान झाले आहे.

ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, आज राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. याचनिमित्ताने राजधानी दिल्लीमध्येही काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमांसाठी हेमंत गोडसे हे दिल्लीमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे.

Previous Post

ठाकरे गटाने जाहीर केली लोकसभा निवडणूक समन्वयक यादी

Next Post

जरांगे पाटलांचे महत्वाचे विधान : तर ते मराठा विरोधी आहेत

Next Post
जरांगे पाटलांचे महत्वाचे विधान : तर ते मराठा विरोधी आहेत

जरांगे पाटलांचे महत्वाचे विधान : तर ते मराठा विरोधी आहेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group