नांदेड : वृत्तसंस्था
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता राज्यातील आंदोलक आक्रमक झाले असून नुकतेच नांदेडमध्ये काँग्रेस आमदाराची कार फोडल्याची घटना घडली आहे. मराठा आंदोलकांनी ही कार फोडल्याची माहिती मिळत आहे. नांदेडमधील पिंपळगाव निमजीमध्ये ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. राज्य सरकारही मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे. या अधिवेशनाआधीच मराठा आंदोलक मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत.
सगेसोयरे अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करा, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरु केलं आहे. याच मागणीसाठी बुधवारी मराठा आंदोलकांनी बीड बंदची हाक दिली होतीराज्यात मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मराठा आंदोलकांनी शुक्रवारी रात्री उशिरा काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांची कार फोडली. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी या भागात ही घटना घडली आहे. आमदार मोहन हंबर्डे हे या भागात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. याचवेळी मराठा आंदोलकांनी आमदार हंबर्डे यांची कार फोडली. या घटनेत आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
.