जळगाव : प्रतिनिधी
चॉपरसह धारदार लोखंडी चाकू घेवून दहशत माजविणाऱ्यांवर शहर पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी कारवाई केली. त्यांच्याकडून शस्त्र जप्त करण्यात आले असून मनोज अंकूश गरुड (वय २४) व गोपाल प्रकाश अडकमोल (वय ३०, दोघ रा. गेंदालाल मिल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तरुण हातात चॉपरसह धारदार लोखंडी चाकू घेवून दहशत माजवित असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून मनोज गरुड व गोपाल अडकमोल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून चॉपर व धारदार लोखंडी चाकू जप्त करण्यात आला. याप्रकरणी अमोल ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल विजय निकुंभ हे करीत आहे.