जळगाव : प्रतिनिधी
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जळगाव शहरात गुरूवारी जाहीर सभा झाली. मात्र, या सभेला शहरातील पक्षाचे सात माजी नगरसेवक गैरहजर असल्याने एकच चर्चा राजकीय वर्तुळात गुरुवारी रंगली होती.
जळगाव लोकसभा मतदारसंघात उबाठा शिवसेना गटाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जळगाव शहर तसेच ग्रामीण भागात तीन सभा घेतल्या. जळगाव शहरात झालेल्या सभेत शहरातील माजी महापौर नितीन लढा यांच्यासह सहा माजी नगरसेवक सभेला उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी समोर आली. सभेचे नियोजन आणि यशस्वितेची जबाबदारी सुनील महाजन, विष्णू भंगाळे, कुलभूषण पाटील आणि शरद तायडे यांच्यासह जयश्री महाजन, ज्योती तायडे, राखी सोनवणे, प्रशांत नाईक हे उपस्थित होते.
सभेला हे माजी नगरसेवक अनुपस्थित
शिवसेनेचे नेते माजी महापौर नितीन लढा, बंटी जोशी, नितीन बरडे, नीता सोनवणे, इब्राहिम पटेल, शेख शबानाबी सादिक, अण्णासाहेब भापसे हे उपस्थित नव्हते होती.