लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या परस्पर तक्रारीवरून वाद निर्माण झाला असून या वादात रोहिणी खडसे यांनी वादग्रस्त स्टेटमेंट केल्यामुळे आज सायंकाळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी अप्पर पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन आपल्या जिवाला एकनाथराव खडसे व ऍडव्होकेट रोहिनी खडसे यांच्यापासून जीवाला धोका असल्याची माहिती पोलिस प्रशासनाला दिली याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात फेसबुक वरील एका पोस्ट वरून वाद निर्माण झाला या वादातून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल झाले आहे या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असता असेच सुरु राहिले तरं उद्या आम्ही महिला आमदाराला देखील मारहाण करण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशा इशारा ऍड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी दिला आहे.
आमदारांना चोप देणे ही एका गुंड प्रवृत्ती लोकांची भाषा असू शकते खऱ्या अर्थाने दोन वर्षापासून आमदार झाल्या पासून या दोघं बाप आणि बेटी चे कटकारस्थानं माझ्या लक्षात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यांना मी डोईजड होत आहे त्यांच्या मनामध्ये माझ्या बद्दल त्याच्या मनात घृणा निर्माण झाली आहे असेही ते म्हणाले मला कधी मारून टाकतील कधी माझा घातपात करतील सांगता येत नाही माझे कुटुंब यांच्यापासून असुरक्षित आहे या सर्व त्याच संदर्भात मी एचपी कार्यालयात आल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चिंता यांची त्यांनी भेट घेऊन याबद्दल तोंडात तक्रार केली असून लवकरच या बद्दल लेखी तक्रार करणार असल्याचेही सांगितले तसेच या घटनेची माहिती सोमवारी मुख्यमंत्र्यांनाही देणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.