चाळीसगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सुरु असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाकडून अनेक घडामोडी सुरु असतांना देखील चाळीसगाव तालूक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पूर्ववैम्यन्यातून एकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अापल्या घरावर गाेळीबार झाल्याचा बनाव करून खाेटी तक्रार दिली. तसेच त्यासाठी परराज्यातून गावठी कट्टा व दोन गोळ्याही विकत घेतल्याचा प्रकार तालुक्यातील भोरस येथे समाेर अाला आहे. याप्रकरणी दाेघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला असून एकास अटक करण्यात अाली अाहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव ग्रामीण पोलिसात पहाटे फोन आला की, भोरस चौफुलीवर कैलास रघुनाथ पाटील यांच्या घरावर गोळीबार झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता कैलास पाटील यांनी सांगितले की,पहाटे ३ वाजेच्या सुमारास कोणीतरी घराबाहेर माझ्या नावाने शिवीगाळ करून गोळ्या मारण्याची धमकी देत असल्याचा आवाज आला. या आवाजावरून तो रघुनाथ वामन गोसावी असल्याचे मी ओळखल्याचे सांगितले.
पोलिसांनी कैलास पाटील व संशयित रघुनाथ वामन गोसावी यांची चौकशी केली असता त्यात रघुनाथ गोसावीचा संबंध नसल्याचे दिसले. कैलास पाटील याची कसून चौकशी केली असता त्याने संपूर्ण घटना बनाव असल्याचे कबूल केले. कैलास पाटील याच्यावर गोसावी याने दोन गुन्हे दाखल केले होते. तसेच मारहाण देखील केली होती. त्याचा राग डोक्यात घेऊन हा प्रकार पाटील याने केला.