जळगाव : प्रतिनिधी
कॉलेजला जाते सांगून घरातून निघालेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना सोमवार दि. १२ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्यास आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता मुलगी ही सकाळी कॉलेजला जात असल्याचे सांगून घरातून निघून गेली. त्याच्यानंतर ती रात्रीपर्यंत घरी आली नाही. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्या बाबत कुठेही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनीपोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार हरीश पाटील हे करीत आहे.